26.3 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमनोरंजनबॉलिवूडचे पाच सिक्वेल चित्रपट ज्यांनी बॉक्स ऑफिसचे मोडले सर्व रेकॉर्ड

बॉलिवूडचे पाच सिक्वेल चित्रपट ज्यांनी बॉक्स ऑफिसचे मोडले सर्व रेकॉर्ड

मुंबई : चित्रपट जगतात अनेकदा असे दिसून येते की एखादा चित्रपट हिट झाल्यानंतर निर्ताते त्याच्या सिक्वेलच्या नावाने झटपट पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रसंगी अपयशाला सामोरे जावे लागते. बॉलीवूडमध्ये सिक्वेल चित्रपटांचा मोठा इतिहास आहे आणि त्या सिक्वेलमध्येही चांगली कामगिरी न करण्याचा इतिहास आहे. तथापि, या काळात, असे काही सिक्वेल आले ज्यांनी बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड मोडले. आशा बॉलिवूडच्या पाच चित्रपटावर नजर टाकूया.

‘गदर २’
या यादीत पहिले नाव आहे सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या गदर २ या चित्रपटाचे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर एकूण ६८६ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट गेल्या वर्षीच्या सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांपैकी एक होता. २००१ मध्ये रिलीज झालेल्या दिग्दर्शक अनिल शर्माच्या ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा पुढचा भागही प्रेक्षकांना आवडला होता.

‘टायगर जिंदा है’
या यादीत बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘टायगर जिंदा है’ दुस-या क्रमांकावर आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ५५८ कोटींची कमाई केली होती. २२ डिसेंबर २०२७ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चांगले यश मिळवले. अली अब्बास जफर दिग्दर्शित हा चित्रपट २०१२ मध्ये आलेल्या ‘एक था टायगर’या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

‘धूम ३’
या यादीत ‘धूम ३’ तिस-या क्रमांकावर आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट विजय कृष्ण आचार्य यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट ‘धूम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेले दोन्ही भाग ब-यापैकी यशस्वी झाले होते. बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान धूम ३ मध्ये दिसला होता. या चित्रपटाने जागतिक बॉक्समध्ये ५५२ कोटींची कमाई केली होती.

‘स्त्री २’
नुकताच प्रदर्शित झालेला ‘स्त्री २’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट खूप हिट झाला आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाने आतापर्यंत ५०५ कोटींची कमाई केली आहे. या यादीत हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आला आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सीक्वल आहे.

‘टायगर ३’
‘टायगर ३’ हा सलमान खानच्या टायगर मालिकेतील तिसरा चित्रपट या यादीतील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर ४६४ कोटींचा व्यवसाय केला होता. ‘टायगर’ सिरीजच्या या चित्रपटाचे दोन भाग यापूर्वीच प्रदर्शित झाले आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR