27.6 C
Latur
Monday, May 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअफगाणिस्तानमध्ये महापूराने ३०० जणांचा बळी

अफगाणिस्तानमध्ये महापूराने ३०० जणांचा बळी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानमध्ये भीषण महापूर आला असून सुमारे ३०० जणांचा बळी गेल्याची माहिती आहे. आंतरराष्ट्रीय मीडियाच्या रिपोर्टनुसार अफगाणिस्तानमध्ये तीनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. अचानक आलेल्या महापुरामुळे अनेक भागांमध्ये हाहा:कार माजला आहे.

बागलान येथील नैसर्गिक आपत्ती विभागाचे प्रमुख हेदायतुल्ला हमदर्द यांनी सांगितले की, बुर्का, नाहरीन आणि केंद्रीय बागलानमध्ये महापूर आला आहे. पूरग्रस्त लोकांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. मृतांच्या आकड्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय. तालिबान आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार पूरग्रस्त भागात बचाव पथक कार्यरत आहे.

महापुरामध्ये जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. दुर्घटनेमुळे बेपत्ता झालेल्यांचा आकडा अद्याप पुढे आलेला नाही. इस्लामिक अमिरातचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी पूरग्रस्तांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहेत. महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे देशभरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा चौदा लोकांचा मृत्यू झाला होता. मागच्या सहा महिन्यामध्ये अफगाणिस्तानच्या हेलमंद प्रांतात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे घराचे छत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR