22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरटँकर सुरु करण्याची हमी दिल्याने अन्नत्याग आंदोलन स्थगित

टँकर सुरु करण्याची हमी दिल्याने अन्नत्याग आंदोलन स्थगित

मंगळवेढा:
श्री संत दामाजी नगर हद्दीत टँकर सुरु करण्याच्या मागणी प्रस्तावात जुटी असल्याने त्या त्रुटी दूर करुन फेर सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्याने मंगळवारी पं. स. कार्यालयासमोर सरपंच जमीर सुतार, ग्रामपंचायत सदस्य आण्णासो आसबे व अन्य नागरिक आदीजण करणारे अन्नत्याग आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

श्री संत दामाजीनगर मंगळवेढा शहर हद्दीलगत असून या हद्दीतील नागरिकांना यापूर्वी नगरपालिकेकडून नळ पाणीपुरवठा होत असे. सध्या येथे ग्रामपंचायत स्थापन झाल्याने उर्वरीत नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतवर आल्याने टँकरसाठी यापूर्वीच प्रस्ताव देवूनही टैंकर मिळत नसल्याने सरपंच जमोर सुतार व ग्रामपंचायत सदस्य आण्णासो आसबे यांनी नागरिकांसह पं.स. कार्यालयासमोर अप्रत्याग करण्याचा लेखी इशारा गटविकास अधिकारी योगेश कदम यांना दिला होता.दरम्यान या मागणीवर प्रांत अधिकारी बी. आर. माळी यांनी तात्काळ सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावून पाणी टैंकरबाबत चर्चा केली.

यावेळी टँकर सुरु करण्याच्या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. ज्या नागरिकांना सध्या पाणी मिळत आहे त्यांचीही संख्या या प्रस्तावात आल्याने अशा लोकांची संख्या वाढल्याने त्या त्रुटी दूर करून वस्तुस्थिती दर्शक प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना प्रांतापिकारी माळी यांनी केल्यानंतर तसे लेखी पत्र गटविकास अधिकारी कदम यांनी ग्रामपंचायतला दिले असून हा प्रस्ताव ग्रामसेवक मोरे यांनी तात्काळ दुरुस्त करून मंगळवारी सादर केला असल्याचे सांगण्यात आले.

येत्या दोन दिवसात टँकर सुरु न झाल्यास जेष्ठ नेते बबनराव आवताडे व सिध्देश्वर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा अन्नत्याग आंदोलन सरपंच व सर्व सदस्य प्रांताधिकारी कार्यालयासमोर करतील, असा इशारा सदस्य आसवे यांनी प्रशासनास दिला आहे.अनत्याग आंदोलनकर्ते सरपंच जमीर सुतार, सदस्य आण्णासो आसबे यांना गटविकास अधिकारी यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून तुर्त आंदोलन स्थगित करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR