औसा ( प्रतिनिधी )- औसा विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन लाख चार हजार तीनशे सात मतदारांना मतदान करण्यासाठी ३०९ मतदान केंद्राची व्यवस्था औसा आणि निलंगा तालुक्यातील समाविष्ट असलेल्या गावासाठी करण्यात आली आहे.
विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक सुरळीत संपन्न होण्यासाठी दि. १९ नोव्हेंबर रोजी सकाळपासूनच नियुक्त केलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाण्यासाठी ५८ वाहनातून पोलिस क्वार्टर नजीक असलेल्या मैदानावर मंडप मारून ठरवून दिलेल्या मार्गावरून मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या ३० बस, सात मिनी बसेस आणि ३१ क्रुझर जीप च्या माध्यमातून कर्मचारी रवाना झाले असून मतदार संघातील मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासाठी विद्युत पुरवठा पिण्यासाठी पाणी शौचालय आणि अधिकारी कर्मचारी यांची बैठक व्यवस्था व मतदान कक्ष यांची सूत्रबद्ध उभारणी करण्यात आली असून भरारी पथकाच्या माध्यमातून प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्था झाली किंवा नाही याची पाहणी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश कोरडे आणि तहसीलदार घनश्याम अडसूळ यांनी दिली . युवा , दिव्यांग कर्मचारी व युवा मतदान केंद्र मतदारसंघात करण्यात आले आहेत.