23.4 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeपरभणीचौथ्या वेळेस नॅक मूल्यांकनास के. के. एम. महाविद्यालय सज्ज

चौथ्या वेळेस नॅक मूल्यांकनास के. के. एम. महाविद्यालय सज्ज

मानवत : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नॅक मूल्यांकनास चौथ्या वेळेस सामोरे जाण्यासाठी के. के. एम. महाविद्यालय सज्ज झाले असून दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी नॅक समिती महाविद्यालयास भेट देणार आहे.

यापूर्वी महाविद्यालयाने तीन वेळेस मूल्यांकन केले आहे. नॅक मूल्यांकनाची ही चौथी वेळ आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण महाविद्यालयामध्ये चौथ्या वेळेस नॅक मूल्यांकनास सामोरे जाणारे पहिले महाविद्यालय आहे. या समितीमध्ये केंद्रीय विद्यापीठ कडगंजी, गुलबर्गा येथील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक रोमेट जॉन, सौराष्ट्र विद्यापीठातील सेवानिवृत्त प्रोफेसर पुरुषोत्तम मारवानिया, मदनलाल शुक्ला शासकीय पदव्यूत्तर महाविद्यालय, बिलासपूरचे प्राचार्य राजीव खेर यांचा समावेश आहे.

ही समिती महाविद्यालयातील संशोधन कार्य, विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट सुविधा, भौतिक सुविधा यांची पाहणी करणार आहे. यापूर्वीच्या मूल्यांकनापेक्षा पुढील मूल्यांकन मिळण्यासाठी सर्व तयारी केली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, नॅक समन्वयक डॉ. दुर्गेश रवंदे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR