27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रआमच्यासाठी फडणवीसच मुख्यमंत्री, शिंदे प्रोटोकॉल पुरते : आ. गणेश नाईक

आमच्यासाठी फडणवीसच मुख्यमंत्री, शिंदे प्रोटोकॉल पुरते : आ. गणेश नाईक

मुंबई : ठाणे येथे भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्यासाठी विजयी संकल्प मेळाव्याचे रविवारी आजोयन करण्यात आले होते. यामध्ये आमदार गणेश नाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री आहेत. आमच्यासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत.

यावेळी आपल्या भाषणात आमदार गणेश नाईक म्हणाले, एकनाथजी शिंदे राज्यासाठी मुख्यमंत्री आहेत. पण आमच्या दृष्टीने देवेंद्र फडणवीस इज आवर लीडर. मी तर हे ओपन बोलतो. प्रोटोकॉल म्हणून एकनाथ शिंदे राज्याचे प्रमुख आहेत. पण पक्षाच्या अनुशंगाने, देवेंद्र फडणवीस यांच्या अनुशंगानेच भाजपचे काम चालते आणि भविष्यातही ते चालणार आहे.

राज्यात सध्या विधान परिषदेची निवडणूक सुरू आहे. यामध्ये मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक विभागीय शिक्षक या चार जागांसाठी येत्या २६ जूनला मतदान होत आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीला महाविकास आघाडीने चांगलाच दणका दिला. यामध्ये गेल्या निवडणुकीत २३ जागा जिंकणा-या भाजपची ९ जागांवर घसरण झाली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ जागांवर विजय मिळाला. दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मात्र एकच जागा मिळाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR