मुखेड: प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यासह इतर तिन राज्य व मुखेड शहर व तालुक्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले,प्रसिध्द, प्राचीन कालीन मंदीर म्हणुन सर्वदूर परिचित असलेले मुखेडचे ग्रामदैवत श्री.वीरभद्र स्वामी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून निधी मंजुर करुन आणण्यासाठी आमदार डॉ.तुषार राठोड यांनी पाठपुरावा केला असुन त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. सदरील काम डिसेंबर महिन्यात सुरुवात होणार असल्याची माहिती आ.डॉ.तुषार राठोड यांनी मंदिरात झालेल्या बैठकीत दिली.
कर्नाटक,आंध्रप्रदेश,तेलंगणा व महाराष्ट्रातील भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या श्री वीरभद्र स्वामी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाने ५ कोटी मंजूर केले आहे. सदरील संभाव्य मंदिराचे आराखडा व प्रतिकृती रविवारी सकाळी श्री वीरभद्र स्वामी मंदिरात स्थापत्य विशारद चंद्रशेखर जंगली यांनी एलईडीवर दाखविली त्यामध्ये भक्ती निवास, सभामंडप व इतर कामांचा समावेश होता.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, माजी नगराध्यक्ष गंगाधर राठोड, मुखेडभुषण डॉ.दिलीपराव पुंडे, कंत्राटदार अंगद मैलारे, विलास चौधरी, उपसभापती व्यंकटराव पाटील चांडोळकर,डॉ.वीरभद्र हिंगमिरे, वसंतराव संबुटवाड, कृउबाचे संचालक व्यंकटराव लोहबंदे,अनिलसेठ जाजू, सदाशिवराव जाधव, ओंकार अप्पा मठपती, भारत गरुडकर, शिवाजीराव गेडेवाड,विनोद आडेपवार, मंदिराचे पुजारी विरभद्र महाराज स्वामी, संतोष महाराज स्वामी सह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, अनेक मान्यवर कार्यकर्ते व भक्तगण उपस्थित होते. सदर विकासनिधीतुन श्री वीरभद्र स्वामी मंदिर,भक्ती निवास, सभामंडप व स्वच्छता गृह व इतर विकासकामे होणार आहेत. त्यामुळे या परिसराचा कायापालट होणार आहे तसेच भाविकांचीही सोय होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश जोशी यांनी दिली.