नांदेड : प्रतिनिधी
नांदेड लोकसभा मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पत्नी माजी आ. अमिता चव्हाण या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी सोमवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गेल्या होत्या. दरम्यान त्यांचा ताफा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला व एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आरक्षण मिळेपर्यंत नेत्यानी गावात येऊ नये अशी भूमिका घेतली.
नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाची उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी व भाजप कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत सोमवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान माजी आमदार अमिता चव्हाण या मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथे गेल्या होत्या. त्यांचा ताफा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रोखला पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करून अमिता चव्हाण यांना सुखरूप गाव बाहेर काढले. सदर घटनेबाबत वृत्तलिहेपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती.