जिंतूर : पोखर्णी ता.जिंतूर येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा दि.५ रोजी माजी आ.विजय भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (मा.शरदचंद्र पवार गट) मध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला.
यामध्ये पोखर्णी येथील दादाराव पारेकर, केशव बेंगाळ, कैलास काचगुंडे, भगवान पोले, माधव काचगुंडे, सुरेश काचगुंडे, रावजी काचगुंडे, अंकुश गडदे, परमेश्वर काचगुंडे, गजानन पोले, विठ्ठल गडदे, विष्णू बेंगाळ, ज्ञानेश्वर पारेकर, रामा पोले आदिंनी भाजपची ध्येय धोरणे, जातीपातीचे राजकारण व जिंतूर येथील अकार्यक्षम नेतृत्व यांना कंटाळून माजी आ. भांबळे यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (मा.शरदचंद्र पवार) गटात जाहीर प्रवेश केला.
यावेळी माजी आ. भांबळे यांनी सर्वांचे पक्षाचा रुमाल घालून पक्षात स्वागत केले व पुढील निवडणुकीसाठी सर्व ताकतीने कामास लागून पक्षाचे विचार व विकास तळागळापर्यंत पोहचवण्याचा सल्ला दिला. यावेळी विश्वनाथ राठोड, अंकुश पवार, संतोष पारेकर, शंकर पवार, शिवाजी काचगुंडे इत्यादींसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.