20.9 C
Latur
Friday, February 14, 2025
Homeक्रीडामाजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन

जयपूर : माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचे निधन झाले आहे. माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा याचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे. राजस्थान रणजी क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू रोहित शर्मा अनेक दिवसांपासून आजारी होता.
त्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली आहे. या बातमीनंतर संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.

राजस्थानचा माजी खेळाडू रोहित शर्माचे वयाच्या ४० व्या वर्षी निधन झाले आहे. तो आक्रमक फलंदाज होता आणि लेग-स्पिन गोलंदाजीही करत होता. प्रकृती खालावल्याने रोहित शर्माला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रोहित शर्मावर यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते.

राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा समावेश आहे. रोहित शर्मा आतापर्यंत राजस्थान रणजी संघाकडून ७ रणजी सामने खेळला आहे. याशिवाय त्याने २८ एकदिवसीय रणजी सामने आणि ४ टी-२० सामने खेळले आहेत. रोहित शर्माची जयपूरमध्ये आर. एस. अकादमी नावाने क्रिकेट अकादमीही आहे.

रोहित शर्मा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जायचा. रोहित शर्मा राजस्थान रणजी संघाचा माजी क्रिकेटपटू होता. रोहितच्या निधनामुळे राजस्थान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. रोहित शर्माने अनेक रणजी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR