मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी हे होर्डिंग उभारणा-या इगो मीडियाची माजी संचालक जान्हवी मराठे हिला मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीने अटक केली आहे. गोव्यातून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यापासून पोलिस तिच्या मागावर होते.
एसआयटीने जान्हवीसह कंत्राटदार सागर कुंभारला देखील अटक केली आहे. या दोघांना गोव्यातूनच ताब्यात घेण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्याच कंत्राट सागरने घेतल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे. उद्या या दोघा आरोपींना कोर्टात हजर केले जाणार आहे. दरम्यान, दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला होता यामध्ये ७४ जण जखमी झाले होते. जान्हवी मराठे डिसेंबर २०२३ पर्यंत इगो मीडियाची संचालक म्हणून काम पाहत होती. तिच्याच काळात घाटकोपर येथील दुर्घटनाग्रस्त झालेल होर्डिंग उभारण्यात आले होते.