लातुर प्रतिनिधी-
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूर शहरातील बार्शी रोडवरील महाराष्ट्र हाउसिंग सोसायटीतील लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देऊन, त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईकपणे चौकशी करून लातूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक सर्जेराव मोरे, विलास को-ऑपरेटिव बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दत्ता शिंदे, गणेश एसआर देशमुख आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शिंदे कुटूंबीय मित्रपरिवार उपस्थित होते