23 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeमहाराष्ट्रआष्टीचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात?

आष्टीचा माजी आमदार हनीट्रॅपच्या जाळ्यात?

नगर : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याकडे तब्बल एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी नगरमधील दोन महिलांसह तीन जणांवर नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात आज (ता. २९) मध्यरात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी आमदार धोंडे यांनी मध्यरात्री दीडच्या सुमारास स्वत: फिर्याद दिली असून आरोपी महिला कल्पना सुधीर गायकवाड (रा. नगर), महिला बांगर (पूर्ण नाव व पत्ता नाही), इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बॉक्सर (रा. नगर) यांनी संगनमत करून तुमची अश्लिल व्हिडिओ क्लीप आमच्याकडे आहे. ती सोशल मिडीयावर व्हायरल करून तुमची राजकीय कारकिर्द संपवू अशी धमकी दिली होती.

या फिर्यादीनुसार वरील तीन आरोपींविरुद्ध नगर येथील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षिका योगिता कोकाटे या करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR