17.5 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

नाशिक : प्रतिनिधी
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे गुरुवारी सकाळी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती दिंडोरी लोकसभा मतदारसंघात वा-यासारखी पसरली. त्यानंतर माजी खासदार हरिश्चंद चव्हाण यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करण्यात आला. त्यानंतर ठिकठिकाणी माजी खासदार हरिश्चंद चव्हाण यांच्या कार्याबद्दल चर्चा ऐकावयास मिळाली. हरिश्चंद चव्हाण यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नव्हती. त्यांचे पार्थिव अन्त्यदर्शनासाठी पाटील गल्ली क्रमांक ४, कॉलेज रोड, नाशिक या त्यांच्या निवासस्थानी अन्त्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

हरिश्चंद्र चव्हाण यांनी २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. लोकसभा निवडणूक २०१४ मध्ये त्यांनी माजी खासदार भारती पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारती पवार त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढल्या. दरम्यान २०१९ मध्ये भारती पवार भाजपामध्ये आल्या. त्यानंतर भाजपाने हरिश्चंद्र चव्हाण यांची उमेदवारी नाकारून भारती पवार यांना उमेदवारी दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. भाजपाने भारती पवार यांना उमेदवारी दिली, त्यानंतरही हरिश्चंद चव्हाण हे भाजपाशी एकनिष्ठ राहिले.

मालेगाव, दिंडोरीचे प्रतिनिधित्व
मालेगाव आणि नंतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून त्यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, इथेही त्यांनी पदे भूषवली. दिंडोरीचे खासदार असताना भाजपाचे सरकार वाचवण्यासाठी एअर अ‍ॅब्युलन्सने त्यांनी दिल्ली गाठली आणि मतदान केले. भाजपाशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांना २०१९ च्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाने तिकिट दिले नव्हते. मात्र तरीही ते भाजपात राहून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR