24.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांचे निधन

धुळे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि धुळे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार प्रतापदादा नारायण सोनवणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी प्रतापदादा यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. शुक्रवारी त्यांचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवशीच प्रतापदादांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या जाण्याने मतदारसंघातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रतापदादा जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून प्रतापदादा सोनावणे सलग दोनवेळा निवडणूक आले होते.

मतदारसंघ पूर्नरचनेत धुळे हा नवीन लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्याने प्रतापदादा यांना २००९ मध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. शैक्षणिक क्षेत्रात दादांचे मोठे योगदान राहिले. मराठा विद्या प्रसारक शिक्षण (मविप्र) संस्थेचे अध्यक्ष व सभापती अशी पदे त्यांनी भूषवली होती. प्रतापदादा यांच्या पाठीमागे राजकीय वारसा होता. त्यांचे वडील दिवंगत नारायण सोनवणे हे बागलाण मतदारसंघाचे आमदार होते. प्रतापदादांच्या निधनाचे वृत्त कळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी शोक व्यक्त केला.

प्रतापदादांच्या जाण्याने जिल्ह्याची मोठी हानी झाल्याचे मंत्री दादा भुसे म्हणाले. प्रतापदादांनी कधीही सत्ता वा कसलाही मोह ठेवला नाही. आपले आयुष्य जनतेप्रती समर्पित केले. एक चांगला व स्वच्छ प्रतिमा असलेला नेता आपण गमावला आहे, असे दादा भुसे यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR