35.6 C
Latur
Sunday, March 16, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणूक रिंगणात

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणूक रिंगणात

वर्सोव्यातून अपक्ष लढणार

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. संजय पांडेकडून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईच्या झुलेलाल मंदिरात दर्शन घेऊन त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यामुळे विधानसभेची अधिसूचना जारी होण्याअगोदरच पांडे यांनी वर्सोवा मतदारसंघात उत्सुकता वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे वर्सोवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट करून दिली. ते मागील ब-याच दिवसांपासून सक्रिय राजकारणात येण्याचा विचार करत होते. मात्र, आता त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.

यामुळे वर्सोवा मतदारसंघात चुरशीची लढत होणार हे निश्चित झाले आहे. पांडे ब-याच वर्षांपासून वर्सोव्यात वास्तव्य करतात. त्यामुळे या भागात त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. सध्या हा मतदारसंघ भाजपकडे असून, डॉ. भारती लव्हेकर येथील विद्यमान आमदार आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणी झाली होती अटक
दरम्यान, संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अटकेनंतर संजय पांडे खूप चर्चेत आले होते.

यासोबतच सीबीआयने संजय पांडे यांच्या आयएसईसी सर्व्हिसेस कंपनीवरही गुन्हा दाखल केला होता. या कंपनीचे २ लेखापरीक्षित स्टॉक ब्रोकर्सचे ऑडिट करण्यात आले. ऑडिटमध्ये अनेक अनियमितता आढळल्याचा आरोप सीबीआयने केला होता, मात्र पुरेशा पुराव्याअभावी सीबीआयला क्लोजर रिपोर्ट दाखल करता आला नाही. ते १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून शिक्षण घेतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR