29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeक्रीडापाक क्रिकेटचे माजी अध्यक्ष शहरयार कालवश

पाक क्रिकेटचे माजी अध्यक्ष शहरयार कालवश

कराची : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष शहरयार खान यांनी शनिवारी वयाच्या  वर्षी लाहोरमध्ये अखेरचा श्वास घेतला. शहरयार खानच्या मृत्यूला पीसीबीने दुजोरा दिला आहे.

शहरयार खान यांचे भारतातल्या भोपाळच्या नवाब घराण्याशी थेट नाते आहे. शहरयार यांची आई बेगम आबिदा सुलतान या भोपाळच्या राजकुमारी होत्या. शहरयार खान हे टायगर पतौडी यांचे मावस भाऊ व अभिनेता सैफ अली खान यांचे काका होते.

डिसेंबर २००३ ते ऑक्टोबर २००६ आणि ऑगस्ट २०१४ ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत शहरयार यांनी पीसीबीचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. शहरयार यांनी १९९९ च्या भारत दौ-यात आणि आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २००३ दरम्यान पाकिस्तान पुरुष संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून काम केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR