नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. सिंग यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. डॉक्टरांच्या एका पथकाकडून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे ९१ वर्षांचे असून मागच्या काही काळापासून ते आरोग्यविषयक समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे याआधीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.