21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयचार जणांना जीपची धडक; चौघांचा जागीच मृत्यू

चार जणांना जीपची धडक; चौघांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : तेलंगणातील नालगोंडा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अन्य तिघे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नातेवाईकाचा मृतदेह घरी आणणाऱ्या चार जणांना जीपने धडक दिली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, मृतांची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

या घटनेची माहिती देताना निदामनूर पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक (एसआय) म्हणाले की, पहाटे चार वाजता हा अपघात झाला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेहांचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दुचाकीस्वार २४ डिसेंबर रोजी वांपड गावात मोटारसायकलवरून जात होता. चौकात पोहोचताच त्याचा अपघात झाला आणि मोटारसायकल पादचाऱ्याला धडकली. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR