32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्रराहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न

राहुल नार्वेकरांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न

आमदारांची परदेशवारी करणा-या कंपनीकडे मागितले पैसे

मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवर पैशांची मागणी केली आहे. या प्रकरणी दोन इसमांविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांची परदेश वारी करणा-या कंपनीकडे राहुल नार्वेकरांच्या नावे तोतया लोकांनी पैसे मागितले होते.

आमदारांची परदेशवारी करणा-या कंपनीकडे तोतया लोकांनी पैसे मागितले होते. टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडे अध्यक्षांच्या नावे पैसे मागितले. नार्वेकर यांच्या नावाने तोतया इसमाकडून फोनवरून पैशांची मागणी केल्याने कंपनीच्या कर्मचा-याला संशय आला. कंपनीच्या कर्मचा-यांनी प्रसंगावधान दाखवल्याने फसवणूक टळली आहे. नार्वेकर यांच्या स्विय सहाय्यकाकडून मरीन ड्राईव्ह पोलिस स्थानकात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR