सोलापूर : बनावट खरेदी दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जगदंबा नगर औद्योगिक वसाहत येथे घडली. याप्रकरणी नंदकिशोर श्रीकिसन राठी (वय-७२, रा. पूर्व मंगळवार पेठ )यांनी एम आयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अशोक बाळकृष्ण कोंडा (वय-६८, रा. पदमानगर न्यू, पाच्छापेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी व सौ कांबळे व कैलासवासी संभाजी कांबळे यांच्या मौजे कसबा सोलापूर सर्वे नंबर १७२/२अ/१ मध्ये प्लॉट नंबर २५ यांचे फिर्यादी यांची मान्यता न घेता वरील संशयित आरोपी याने त्या जागेचे एकत्रित चतु:र्सीमा टाकून तो प्लॉट संशयित आरोपी याने बाळकृष्ण सदाफुले (वय-५४, रा. उत्तर सदर बझार लष्कर) व राजू घोडके (वय-५४, प्लॉट नंबर ४५ न्यू मल्लिकार्जुन नगर, एम आयडीसी) यांच्यासोबत रजिस्टर खरेदी दस्त क्रमांक ४२२३/२०२४ सपउ-२ दि. २६ जुन २०२४ अन्वये बनावट रजिस्टर खरेदी दस्त तयार करून फिर्याद यांची फसवणूक केली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोसई. गाढवे हे करीत आहेत.