22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीययूपीच्या लेडी सिंघम श्रेष्ठा ठाकूर यांची फसवणूक

यूपीच्या लेडी सिंघम श्रेष्ठा ठाकूर यांची फसवणूक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या पोलिस उपअधीक्षक श्रेष्ठा ठाकूर यांची मेट्रोमोनियल साईटवरुन फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासोबत एका खोट्या आयआरएस अधिका-याने विवाह करुन लाखो रुपयांना गंडवले आहे. लग्नानंतर महिला पोलिस अधिका-यास या फसवणुकीची माहिती मिळाली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांनी आरोपीपासून घटस्फोट घेतला आहे. पण, तो पत्नीचे नाव वापरुन अनेकांची फसवणूक करत होता. त्यानंतर श्रेष्ठा ठाकूर यांनी तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, श्रेष्ठा ठाकूर या २०१२ बॅचच्या राज्य पोलिस दलातील अधिकारी आहेत. सध्या त्या यूपीच्या शामलीमध्ये तैनात आहेत. श्रेष्ठा ठाकूर या लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २०१८ मध्ये त्यांचे लग्न रोहित नावाच्या एका व्यक्तीशी झाले होते. त्यांची भेट एका मेट्रोमोनियल साईटवर झाली होती. रोहितने स्वत:ला २००८ बँचचा आयआरएस अधिकारी सांगितले होते. तसेच सध्या उपायुक्त म्हणून रांची येथे तैनात असल्याचे सांगितले होते.

विशेष म्हणजे श्रेष्ठा ठाकूर यांच्या घरच्यांनी आरोपी रोहित याच्या सत्यतेबाबत पडताळणी केली होती. २००८ च्या बॅचला रोहित राज नावाचा एक अधिकारी निवडला गेला होता. तसेच तो उपायुक्त म्हणून रांची येथे कामाला देखील होता. खोटे नाव धारण करुन आरोपीने फसवणूक केली होती. त्यानंतर श्रेष्ठा आणि रोहित यांचे लग्न झाले. पण, लग्नानंतर श्रेष्ठा यांना खरी गोष्ट कळली. पण, बदनामी होईल म्हणून त्यांनी आधी ही गोष्ट बाहेर येऊ दिली नाही.

रोहित पुढेही अनेक गोष्टींमध्ये फसवणूक करु लागला होता. त्याला कंटाळून अखेर श्रेष्ठा ठाकूर यांनी घटस्फोट घेतला. पण, तरीही रोहित विविध प्रकारे महिला पोलीस अधिका-याचे नाव सांगून लोकांची फसवणूक करु लागला. त्यांच्याकडून पैसे उकळू लागला. या सगळ्यामुळे हैराण झालेल्या श्रेष्ठा ठाकूर यांनी अखेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. आरोपीने महिला पोलिस अधिका-याकडून लाखो रुपये घेतल्याचे सांगितले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR