24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeधाराशिवनायब तहसीलदार असल्याचे सांगून अडीच लाखाची फसवणूक

नायब तहसीलदार असल्याचे सांगून अडीच लाखाची फसवणूक

धाराशिव : प्रतिनिधी
मी नायब तहसीलदार देशमुख आहे, असे सांगून एका भामट्याने तुळजापूर येथील तीघांची २ लाख ४४ हजार ९९९ रूपयांची फसवणूक केली आहे. तुळजाभवानी देवीचा धार्मिक विधी करायचा असल्याचे कारण सांगून किराणा माल व कपड्याच्या दुकानातून साड्या घेतल्या. त्याचे पैसे दिले नाहीत. या प्रकरणी दत्ता तुळजाराम कसबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाणे येथे भामट्याच्या विरोधात २५ नोव्हेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूर येथील शुक्रवार पेठ, मातंगनगर येथे राहणारे दत्ता तुळजाराम कसबे यांची दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तुळजापूर येथे भेट घेतली. मी नायब तहसिलदार देशमुख आहे, असे सांगितले. मला तुमची मदत पाहीजे. माझे बरोबर तहसीलचे कर्मचारी पण येणार आहेत. तुळजापूर येथे आमचा तीन दिवस धार्मिक विधीचा कार्यक्रम आहे. दररोज १२०० माणसांचे जेवणाचे नियोजन आहे. मला सदर कार्यक्रमासाठी किराणा व कपडे खरेदी करण्यासाठी तुमची गरज आहे असे सांगितले.

फिर्यादी दत्ता कसबे व साक्षीदार यांना सोबत घेऊन मंगळवार पेठ येथील भोसले यांच्या कपड्याच्या दुकानातुन १ लाख २५ हजार रूपये किंमतीच्या साड्या घेतल्या व सचिन अग्रवाल यांच्या दुकानातुन ४० हजार रूपये किंमतीचे किराणा सामान घतले. रोख रक्कम पाच हजार व सॅमसंग कंपनीचा एस २३ गॅलक्सी मोबाईल ७४ हजार ९९९ रूपये किंमतीचा घेतला. या सर्व साहित्याची रक्कम न देता त्या भामट्याने एकुण २ लाख ४४ हजार ९९९ रूपये किंमतीचा माल घेवून जावून दत्ता कसबे व इतरांची फसवणूक केली. या प्रकरणी दत्ता कसबे यांनी दि.२५ नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे कलम ४१९, ४२० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR