26.7 C
Latur
Friday, February 21, 2025
Homeपरभणीपरभणीत मोफत राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन

परभणीत मोफत राज्यस्तरीय ब्राह्मण वधू-वर मेळाव्याचे आयोजन

परभणी : अखिल भारतीय पेशवा संघटनेने सर्व शाखीय ब्राह्मणांसाठी रविवार, दि. २६ जानेवारी रोजी दुपारी १२ ते ६ या वेळेत मोफत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन गंगा मंगल कार्यालय, विद्या नगर, परभणी येथे केले आहे. या वधू-वर मेळाव्या उपवर-वधू व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यास उद्घाटक म्हणून डॉ. राहुल अंबेगावकर, अध्यक्ष श्रीपाद धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून बंडु नाना सराफ, बाजीराव धर्माधिकारी, ऍड. किरण सुभेदार, निखिल लातूरकर, समन्वयक लक्ष्मीकांत दडके, वधू-वर मेळावा स्वागत अध्यक्ष सचिन वाडे पाटील यांची उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यासाठी सर्व शाखिय ब्राह्मण समाजातील प्रथम वधू- वर, घटस्फोटीत, विधवा, विधूर, दिव्यांग यांची नाव नोंदणी करण्यात येणार आहे. नाव नोंदणी वधू-वर मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहून नाव नोंदणी करावी असे आवाहन निमंत्रक व परभणी जिल्हा प्रमुख दिपक कासांडे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप जोशी, सचिव नागनाथ नरळदकर, शहर अध्यक्ष गजानन कनकदंडे, शहर उपाध्यक्ष शिवाजी पाटोदकर यांनी केले आहे.

वधू-वर परीचय मेळाव्याच्या अधिक माहितीसाठी दिपक कासांडे यांच्याशी इच्छूक वधू-वर, पालक यांनी संपर्क साधावा. तसेच मेळाव्याला उपवर-उपवधू यांच्यासह पालकांनी उपस्थीत राहावे असे आवाहन अखिल भारतीय पेशवा संघटना परभणी यांच्यातर्फे करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी प्रमुख राम शास्त्री यांनी कळवले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR