उपळे दुमाला ( प्रतिनिधी ) बार्शी तालुक्यातिल उपळे दुमाला येथील ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी शासकिय कामात अनियमितता करुन भ्रष्टाचार केल्याची तक्रार उपळे दुमाला येथील माजी उपसरपंच रामेश्रवर बुरगुटे यांनी .मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.सोलापूर .गट विकास अधिकारी बार्शी वर्ग १ लेखी तक्रार दिली असून तक्रारीत ग्रामपंचायत नमुना नं..१ तं ३३.मधे अनेक फेरफार केले असल्याची चर्चा गावभर आहे तरी संपुर्ण दप्तर तपासणी मुंबई ग्रामपंचायतअधिनियम १९५८ प्रमाणे करण्याची मागणी केलेली आहे.
सदर सरपंच ग्रामसेवक यांनी १४ व्या व १५ व्या वित्त् आयोग या खात्यातील शासन नियमा प्रमाणे खर्च नकरता भ्रष्टाचार करण्यासाठी विविध खात्या मधिल रकम मुल्यांकन नकरता तसेच शासन परिपत्रकांचे अवलोकन न करता मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करुन अपहार केला असुन त्याची आपण स्वतः ग्रामपंचायतला भेट देऊन जि.प .अधिनियम १९६४ प्रमाणे ०१/०३/२०२१ ते ३१/१२/२०२३ या कालावधितील दप्तर तपासुन योग्य् ती कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारी व्दारे करण्यात आली आहे.
सघ्या उपळे दुमाला ग्रामस्थां मधे चौका चौकात ग्रामपंचायतीच्या मनमानि कारभाराची चर्चा आहे .यावरुन बरीच काही आणखीन उकल होण्याची शक्यता नाकारता येत नाही . यात आता उपळे दुमाला ग्रामस्थंचे लक्ष गट विकास अधिकारी काय कार्यवाही करतात याकडे लागलेले आहे . तरी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ही लक्ष घालण्याची मागणी होत आहे .