26.5 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून

पुण्यात सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून

किरकोळ वाद आणि हातोड्याने वार जागीच मृत्यू

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हे घडताना दिसत आहे, खून, हत्या, महिलांवर होणारे अत्याचार या घटनांनी राज्य हादरले आहे, नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच पुण्यातून आणखी एक खूनाची घटना समोर आली आहे.

पुण्यात काल (गुरूवारी) मध्यरात्रीच्या सुमारास सिंहगड रस्त्यावर एका सराईत गुंडाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिंहगड रस्त्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यासाठी बसल्यानंतर वाद झाला आणि त्या वादातूनच मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हनुमंत उर्फ गोट्या शेजवळ असे खून झालेल्या गुंडाचं नाव आहे. तर याप्रकरणी आरोपी गणेश आकाश कुलकर्णी याला सिंहगड रोड पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.

सिंहगड रोडवरील वडगाव ब्रिज परिसरात क्लासिक बार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री गोट्या शेजवळ दारू पिण्यासाठी बसला होता. यावेळी आरोपी आकाश कुलकर्णी हा देखील त्या ठिकाणी होता. हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर आरोपी आकाश कुलकर्णी हा हॉटेलमधून बाहेर पडला. त्यावेळी गोट्या शेजवळ याने आकाश कुलकर्णी याचा पाठलाग सुरू केला. आकाश कुलकर्णीला शेजवळ त्रास देऊ लागला. त्यानंतर दोघेही सिंहगड रस्ता परिसरातीलच सुवर्ण हॉटेल जवळ पोहोचले. या ठिकाणी पुन्हा त्यांच्यात वाद झाला.

पुन्हा गोट्या शेजवळ आकाश कुलकर्णीला त्रास देऊ लागला. त्यानंतर संतापलेल्या आकाश कुलकर्णीने रस्त्याच्या जवळच असणा-या एका पंक्चरच्या दुकानातील हातोडा घेतला आणि गोट्या शेजवळच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने गोट्या शेजवळ रक्ताच्या थारोळ्यात कोसळला यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच सिंहगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी आकाश कुलकर्णी याला ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

वाढदिवसाच्या दिवशी आरोपीचा गेम
स्वत:च्या वाढदिवसाचे सामान घेऊन जाताना बारामती तालुक्यातील जळोचीमध्ये जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने काल(बुधवारी) रात्री गणेश धुळाबापु वाघमोडे (१७) या अल्पवयीन गुन्हेगार मुलाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
खून झालेल्या गणेश वाघमोडे याने शाळेसमोरच शशिकांत कारंडे यांचा खून केला होता. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनी गणेश वाघमोडेची अज्ञातांनी धारदार शस्त्रांनी वार करत खून केल्याची घटना समोर आली आहे. काल(बुधवारी) रात्री बारामती शहरातल्या जळोची येथील काळा ओढा याठिकाणी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी गणेश वाघमोडे याने शशिकांत कारंडे यांचा खून केला होता. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनीच गणेशचा खून करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी नवनाथ उत्तम चोरमले (३९), यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR