25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeराष्ट्रीयतेलंगणात कारखान्यात गॅस कॉम्प्रेसरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू

तेलंगणात कारखान्यात गॅस कॉम्प्रेसरचा स्फोट, ६ जणांचा मृत्यू

रंगारेड्डी : तेलंगणामध्ये गॅस कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन ६ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रंगारेड्डी जिल्ह्यातील शादनगर येथील साऊथ ग्लास इंडस्ट्रीमध्ये हा भीषण स्फोट झाला. या स्फोटात १६ कर्मचारी गंभीर जखमी झाले. स्फोटाच्या घटनेनंतर जखमी कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार कंप्रेसरच्या स्फोटामुळे कामगारांच्या मृतदेहाचे तुकडे झाले. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचवेळी, या घटनेनंतर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संबंधित अधिका-यांना मदत कार्याला गती देण्याचे निर्देश दिले. रंगारेड्डीचे जिल्हाधिकारी शशांक, शमशाबादचे डीसीपी राजेश यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांमध्ये बिहारमधील मजुरांचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील निकित (२२), राम सेतू (२४), चित्तरंजन (२५), बिहार, रामप्रकाश (४५), राधे कांत (२५) ओरिसा अशी मृतांची नावे आहेत. या भीषण स्फोटाचे वृत्त समजताच संपूर्ण परिसरात घबराट पसरली. माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. शमशाबादचे डीसीपी राजेश घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR