25.2 C
Latur
Thursday, June 13, 2024
Homeउद्योगजीडीपी ७.८ टक्क्यांवर!

जीडीपी ७.८ टक्क्यांवर!

चौथ्या तिमाहीत झेप, गतवर्षीच्या तुलनेत मोठी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के इतका राहिला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ६.२ टक्के नोंदवला गेला होता. यामध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली आहे.
२०२४ आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत भारताच्या ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्­टमध्ये मोठी वाढ झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी जीडीपीचे आकडे जाहीर करण्यात आले आहेत. भारताचा जीडीपी मार्चच्या तिमाहीत ७.८ टक्के वाढला आणि केंद्राने आता एफवाय २४ साठी एकूण विकास दर ८.२ टक्के असेल, असा अंदाज वर्तवला आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार होता. भारताने ६.९ टक्क्यांचा अंदाज ओलांडला आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये जीडीपीमध्ये ८.२ टक्के वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षातील वाढीचा दर ७.० टक्के राहिला. सकल मूल्यवर्धित २०२२-२३ मधील ६.७ टक्केच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ७.२ टक्के वाढले आहे. २०२२-२३ मध्ये ते ६.७ टक्के इतके होते. ग्रॉस व्हॅल्यू अ‍ॅडेड मधील वाढ प्रामुख्याने २०२३-२४ मध्ये उत्पादन क्षेत्रातील ९.९ टक्के राहिली. २०२२-२३ मध्ये खाण आणि उत्खनन क्षेत्रातील १.९ टक्के वाढीमुळे फायदा झाला. २०२३-२४ मध्ये ७.१ टक्केची वाढ हे देखील याचे कारण होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR