22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeराष्ट्रीयजीडीपी वाढीचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज : आयएमएफ

जीडीपी वाढीचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज : आयएमएफ

नवी दिल्ली : आयएमएफच्या कार्यकारी संचालकांनी यावर्षी भारताचा जीडीपीवाढीचा दर ७.३ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेचे आर्थिक मूलतत्त्व मजबूत आहेत. चालू वर्षात भारताच्या आर्थिक विकासाचा वेग खूपच चांगला आहे. त्याचे मूल्यांकन केल्यानंतर, आयएमएफने आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक अहवालात जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भारताची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून अंदाज व्यक्त केला आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ६००० रुपयांच्या मदत रकमेत वाढ करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

आयएमएफच्या कार्यकारी संचालकांनी सांगितले की, शेतकऱ्यांना प्रतिवर्षी दिले जाणारे ६००० रुपयांचे सध्याचे प्रमाण ८००० रुपयांवरून ८५०० किंवा ९००० रुपये करणे अधिक चांगले होईल, कारण गेल्या चार-पाच वर्षांत सरासरी महागाई दर ५ टक्के होते, ते ६ टक्के झाले आहे. अंदाजानुसार, या वर्षी भारताचा जीडीपी वाढ ७.३ टक्के असू शकतो. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग पुढील ३ वर्षांपर्यंत ७ टक्के राहिला तर २०२६-२७ पर्यंत भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल. आमचा अंदाज आहे की भारत २०३० पर्यंत ७ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल.

पुढील २-३ वर्षांत जीएसटी संकलन दर महिन्याला सरासरी २ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. व्होट ऑन अकाउंटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नवे प्रस्ताव असू शकतात, मध्यमवर्गीयांसाठीही नवीन घोषणा होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. वैयक्तिक आयकरात काही प्रमाणात सवलत मिळण्याचीही शक्यता आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR