27.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeधाराशिवचॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्‍याचार

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीवर अत्‍याचार

उमरगा : चार वर्षीय चिमुरडीला चॉकलेटचे आमिष दाखवून परप्रांतीय ५२ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्‍याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री आई स्वयंपाक करत असताना चिमुरडी घराबाहेर भावंडांबरोबर खेळत होती. कर्नाटकातील अनिल देवेंद्र कांबळे (रा. बसवकल्याण) याने चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुरडीला खांद्यावर उचलून नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला. मुलीने आरडाओरड केल्‍यानंतर हा प्रकार उघडकीस आला. स्‍थानिकांनी नराधमास पकडून बेदम चोप दिला. या घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी संतप्त जमावाच्या मारहाणीत जखमी आरोपीला ताब्यात घेतले. त्याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी उमरगा पोलिसांत पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अनिल कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तपास पोलिस उपनिरीक्षक अनुसया माने या करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR