25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रसंतोष देशमुखांना न्याय द्या

संतोष देशमुखांना न्याय द्या

बुलडाण्यात ‘काळा' आक्रोश हजारोंची उपस्थिती

बुलडाणा : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेला आता वीस दिवस उलटून गेले आहेत. मात्र या प्रकरणातील काही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना अटक व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीयाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चानंतर आता बुलडाण्यातील सिंदखेड राजा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे.

या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलकांच्या हातात काळे झेंडे असून, हातामध्ये काळे बँड घातले आहेत. काही आंदोलकांच्या हातामध्ये संतोष देशमुख यांना न्याय द्या, सर्व आरोपींना अटक करा, असा मजकूर असलेले पोस्टर देखील आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदोलकांमधून होत आहे. या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील सहभागी झाले आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
दरम्यान या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख या देखील सहभागी झाल्या आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की स्फूर्ती घेण्यासाठी आम्ही सिंदखेड राजा येथे आलो आहोत. मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी वडिलांना न्याय द्यावा. अशी शिक्षा द्या की पुन्हा असा गुन्हा कोणी केला नाही पाहिजे, अशी मागणी यावेळी वैभवी देशमुख यांनी केली आहे. दरम्यान या मोर्चामध्ये राजेंद्र शिंगणे देखील सहभागी झाले आहेत. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिंगणे यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR