21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeक्रीडाबॅडमिंटनमध्ये नितेश कुमारला सुवर्ण

बॅडमिंटनमध्ये नितेश कुमारला सुवर्ण

पॅरिसमध्ये फडकावला तिरंगा भारताला आतापर्यंत २ सुवर्णपदक

पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू नितेश कुमारने चमकदार कामगिरी करत देशाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. नितीश कुमारने विजेतेपदाच्या लढतीत ग्रेट ब्रिटनचा खेळाडू डॅनियल बेथॉलचा पराभव केला. यासह, नितीशने पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्ण जिंकले आहे.

एका अपघाताने नितेशचे आयुष्य जवळपास उद्ध्वस्त झाले होते, पण तरीही त्याने हार मानली नाही आणि आज पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये विजयाचा झेंडा फडकवला आहे. नितेश कुमारला भारतीय सैन्यात भरती व्हायचे होते. त्यांचे वडील नौदलाचे अधिकारी आहेत आणि त्यांच्या मनात नेहमीच देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास होता. मात्र तो १५ वर्षांचा असताना त्याच्यासोबत एक दुर्दैवी घटना घडली. विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात नितेश कुमारला पाय गमवावा लागला होता. या अपघातामुळे त्याचे आयुष्य संपल्यासारखे वाटत होते, क्रीडा क्षेत्रात सक्रिय असलेला हा खेळाडू घरातच बंदिस्त झाला. लष्करात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न भंगल्यासारखे वाटत होते, पण त्यानंतर पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्राने नितेश कुमारच्या आयुष्यात पुन्हा खेळात प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR