पुणे : नवीन वर्षाआधीच चांगली बातमी मिळाली आहे. सलग दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली. यापूर्वी २८ डिसेंबर २०२३ रोजी सोने ६४,२५० रुपये होते. शुक्रवारी सोन्याने सर्वोच्च पातळी गाठली होती.
सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार कायम असला तरी, त्याला मोठी मागणी आहे.
सोन्या-चांदीच्या किमती वर्षाच्या शेवटच्या दिवसांत घसरल्या आहेत. शुक्रवारी सोने ३५० रुपयांनी स्वस्त झाले. त्यात आज म्हणजेच शनिवारी, ३० डिसेंबरलाही सोन्याच्या दरात घट झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा दर ६३,८७० रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. आज २२ कॅरेट सोन्याचा दर ५८,५५० रुपये आहे. आहे. २८ डिसेंबर रोजी सोन्याच्या दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता.