जिंतूर : एकलव्य विद्यालयात राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती पास व शासकीय रेखाकला परीक्षामध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्रीहरी गित्ते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश दराडे, शेखर लहाणे, विभाग प्रमुख श्रीमती आशा केंद्रे, सुधन सानप आदी उपस्थित होते. ८वी इयत्तेसाठीची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन.एम.एम.एस.परीक्षा) पास झालेले विद्यार्थांमध्ये ४ व शासकीय रेखा कला परीक्षा एलिमेंट्री व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के लागल्यामुळे या विद्यार्थ्यांचा सत्कार विद्यालयातर्फे करण्यात आला.
पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे युवराज वाघु राठोड, करण संतोष माघाडे, मुक्तेश्वर एकनाथ कोकाटे, शुभांगी संतोष राठोड हे विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या यशाबद्दल मुख्याध्यापक श्रीहरी गीते, शेखर लहाने, शेषराव चौधरी, गजानन क-हाळे, रवी मते, सिध्देश्वर आघाव, श्रीमती जयश्री लहाने, पांडुरंग वाघमारे, गुलाब चौधरी व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.