नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ‘सीबीटी’ने २०२३-२४ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यासाठी व्याजदर जाहीर केला आहे. चालू आर्थिक वर्षासाठी ‘ईपीएफओ’ने कोट्यवधी कर्मचा-यांच्या व्याजदरात वाढ केली आहे.
आता कर्मचा-यांना पूर्वीपेक्षा ०.१० टक्के अधिक व्याज मिळणार आहे. याचा अर्थ आता तुमच्या पीएफ खात्यावर ८.२५ टक्के व्याजदर दिला जाईल.
गेल्या वर्षी २८ मार्च रोजी ईपीएफओने २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. तर ईपीएफओने आर्थिक वर्ष २०२२ साठी ८.१० टक्के व्याज दिले होते. विशेष म्हणजे ईपीएफओ खासगी क्षेत्रात काम करणा-या कर्मचा-यांच्या पीएफ खात्यावर दरवर्षी व्याजदर जाहीर करते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत ६ कोटींहून अधिक कर्मचारी संबंधित आहेत.