सोलापूर – बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी कायदेशीर मागनि आंदोलन करणाऱ्या बांगलादेशातील इस्कॉनचे प्रमुख स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ही अटक म्हणजे हिंदू अल्पसंख्याकांचे हक्क दडपण्याचा प्रकार आहे. भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका व्हावी आणि हिंदू अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. भारताने बांगलादेशशी असलेले सर्व संबंध तोडावेत आणि प्रसंगी सैनिकी कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने टिळक चौक येथे मूक आंदोलन करण्यात आले.
यात धर्मप्रेमींनी हातात हस्तफलक परून प्रबोधन आणि जागृती केली. या आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे, किशोरकुमार जगताप, विनोद रसाळ, धनंजय बोकडे, संतोष पाटणे यांसह अक्कलकोट, तुळजापूर, सांगोला येथील हिंदु जन जागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनात धर्माभिमानी हिंदूंनी ‘बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्म कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या सुटकेसाठी भारताने हस्तक्षेप करावा’, ‘बांगलादेशात हिंदूंसाठी लढणारे ‘इस्कॉन’चे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना तात्काळ मुक्त करा’, स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्यावरील बांगलादेशी शासनाची दडपशाही हिंदू सहन करणार नाहीत’, ‘बांगलादेशातील ‘इस्कॉन’ चे स्वामी चिन्मय कृष्णदास बह्मचारी यांनी अटक होणे, हा हिंदु धर्मावरीलू आघातच !’, या आशयाचे फलक हातात धरले होते. या वेळी रस्त्यावरून ये जा करणारे अनेक लोक धर्मप्रेमींच्या हातातील फलक आवर्जून थांबून वाचत होते.