नांदेड : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे श्री गुरुगोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे सकाळी विमानाने आगमन झाले.
राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, कमांडिग ऑफिसर कर्नल एम. रंगाराव आदींची उपस्थिती होती.
विमानतळावरुन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उदगीर येथील नियोजित कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरने प्रयाण केले.