पुणे : प्रतिनिधी
पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी साहित्य संमेलन येत्या २० ते २२ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यासाठी मराठी भाषा संवर्धन समिति आणि पुणे महानगरपालिका व संवाद संस्थेने पुढाकार घेतला आहे.कथाकथन परिसंवाद,कवि संमेलन,पुस्तक प्रकाशन, छायाचित्र प्रदर्शन आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन दिवसीय संमेलनाचे अध्यक्षपदी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांची स्वागताध्यक्ष पदी पुणे महानगर पालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध खात्यात सध्या १८ लाख अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी आणि कर्मचारी शासकीय सेवा करीत असताना साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत आहेत.
अधिका-यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने, अन्य राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती आणि अनुभव , प्रशासनातील लक्षवेधी साहित्यनिर्मिती ,कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशासन व साहित्य ,चांगला साहित्यिक ,चांगला अधिकारी या विषयावर परिसंवाद होणार आहेत. तर बहुभाषिक कवि संमेलन तसेच शासनात घडणारे विनोद यावर विविध उच्च पद्स्थ अधिकारी बोलणार आहेत