18.3 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeपरभणीज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये लव यु जिंदगी वार्षिक स्नेहसंमेलनचे थाटात उद्घाटन

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये लव यु जिंदगी वार्षिक स्नेहसंमेलनचे थाटात उद्घाटन

परभणी : येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये लव यू जिंदगी वार्षिक स्नेहसंमेलनचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के, प्रमुख पाहुणे अरविंद निर्मळ (लेखापरीक्षक), अमित घाडगे (तहसीलदार परभणी), डॉ. विकास गायकवाड (माऊली हॉस्पिटल, परभणी), शिवसांभ दादा सोनटक्के, बाळासाहेब गायकवाड, प्रा. शितल सोनटक्के, डॉ. अश्विनी निर्मल, गजानन मिटकरी, सरोज मिटकरी, गजानन लोहट, अजय शिराळ, शिवराज सोनटक्के व सर्व विभागाचे समन्वयक आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन, क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविकात प्रा. शितल सोनटक्के यांनी लव यू जिंदगी वार्षिक स्नेहसंमेलन जगण्याची नवी दिशा व ऊर्जा देणारे आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटक अरविंद निर्मळ यांनी ज्ञानसाधना प्रतिष्ठान विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवण्याचे कार्य करते. या जगण्यावर शतदा प्रेम करावे अशा काव्यमय शैलीत मनोगत व्यक्त केले. यावेळी लव यू जिंदगी या टायटल सॉंगने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. वार्षिक स्नेहसंमेलनची थीम सुपरस्टार शाहरुख खानच्या चित्रपटातील विविध गाण्यावर नृत्य सादरीकरण करून दाखवण्यात आली.

कर्नाटकी नृत्य कांतारा यास प्रेक्षकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर मराठी पोरी, बनके तेरा जोगी, मैं हू डॉन, बोले चुडिया बोले कंगना, कूछ कूछ होता है, आज की रात, कैसे नैनो से नैना मिलाऊ सजना, चल छैया छैया, मेरी घोस्ट की शादी है, टुकुर टूकुर, कश्मिर तू मैं कन्याकुमारी या नाटकावर आधारित बहारदार असे नृत्य सादर करण्यात आले.
याप्रसंगी शाळेतील स्कॉलरशिप, एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षा २०२३ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकासह सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात प्रा. किरण सोनटक्के यांनी शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना शिकणे आणि शिकवणे एवढेच नव्हे; तर जीवन कसे जगावे हे ज्ञानसाधनेतून शिकविले जाते. भविष्याचा वेध घेत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो असे सांगितले. यावेळी चिमुकल्यांची नृत्य सादरीकरण पाहण्यासाठी अनेक मान्यवर पालकांची उपस्थिती होती.

सूत्रसंचालन प्रा. धुळे एस. डी., प्रा. कदम पी.व्ही., प्रा. रणखांबे व्ही.एस. यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांचे आभार खपरले एन. पी. यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी वृंदांनी परिश्रम केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR