सोलापूर : जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह अपग्रेड करून दर शनिवारी पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार असल्यास ते सांगून पोलिस ठाणे पीपल फ्रेंडली करण्याचा संकल्प केला असल्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले
पोलिस अधीक्षक कुलकर्णी हे सोलापुरात रुजू झाल्यानंतर नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही अधीक्षक कुलकर्णी यांनी केलेल्या त्यांच्या योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रिया व मतमोजणी वेळी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे अपग्रेड करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्याच्या इमारती कमकुवत झालेल्या दिसून आल्या.
त्यामुळे या पोलिस ठाण्याच्या इमारती बांधकामाचे प्रस्ताव सध्या मंजूर करून त्यावर काम करण्याचे सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील पाच पोलिस ठाण्यांचे बांधकाम पूर्ण झालेले असून पंढरपूर येथील पोलिस संकुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे पोलिस ठाणे हे पीपल फ्रेंडली करण्यासाठी पोलिस ठाण्यांमधील अंमलदारांना नागरिकांना कशा पद्धतीने वागणूक दिली.
पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण देऊन पोलिस ठाणे पीपल फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे तसेच पोलिस ठाण्यामध्ये दर शनिवारी तक्रार निवारण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांनी त्यांच्या तक्रारी घेऊन पोलिस ठाण्यात यावे दर शनिवारी त्यांच्या तक्रारींचे निराकरण त्यांच्या समोरच करण्यात येईल ज्या तक्रारींमध्ये निराकरण होणार नाही त्या माध्यमातून कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबिला जाणार आहे तसेच महिला सुरक्षा बाबत पोलिसांना प्रशिक्षित करण्यात येऊन महिला सुरक्षा बाबत काम करण्यात येणार आहे जिल्ह्यामध्ये शेतीच्या बांधावरून होणारी बाद मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महसूल आणि पोलिस विभाग मिळून हे वाद सोडविण्यासाठी चालू वर्षांमध्ये मोहीम राबविण्यात येणार आहे.
गुन्हेगारांना गुन्हेगारी कृत्या पासून रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेला पहाट या उपक्रमांतर्गत लवकरच रोजगार मेळावा घेण्यात येणारा आहे सध्या या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांचे कागदपत्रे जमिनीचे काम सुरू आहे ग्रामीण पोलीस दलातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला पोलिसांच्या रेकॉर्डवरील किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना त्यांच्या गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगार दत्तक योजना सुरू करण्यात येणार आहे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला दोन ते पाच गुन्हेगार दत्तक देण्यात येणार आहे.
हे अधिकारी या गुन्हेगारांवर सतत लक्ष ठेवून असणार आहेत त्याचप्रमाणे ग्राम सुरक्षा दल पोलीस पाटील यांना देखील गावांमध्ये तंटे होऊ नयेत म्हणून तसेच चोऱ्या होऊ नये म्हणून ऍक्टिव्हेट करण्यात येणार आहे जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या आस्थापनांनी जास्तीत जास्त सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी केले जेणेकरून चोरांवर मोठ्या प्रमाणात अंकुश ठेवण्यात यश येईल.जिल्ह्यातील हातभट्टीच्या निर्मूलनासाठी सुरू करण्यात आलेले ऑपरेशन परिवर्तन हे चालू असून या ऑपरेशन अंतर्गत मुळेगाव तांडा येथे आणखी एक प्रकल्प उभारण्यात आला आहे या प्रकल्पातून हातभट्टी व्यवसायात असणाऱ्या लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.