26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरशारदा सदन आश्रम शाळेतील मुलींना ‘गुड टच बॅड टच’ विषयावर मार्गदर्शन

शारदा सदन आश्रम शाळेतील मुलींना ‘गुड टच बॅड टच’ विषयावर मार्गदर्शन

मुलींची आरोग्य तपासणी उत्साहात

लातूर : देशात तथा राज्यात चिमुकल्या मुलींवर अत्याचाराच्या अनेक घटना घडत असून या पार्श्वभूमीवर शनिवार दि. २३ ऑगस्ट रोजी आर्वी रोड नांदगाव येथील शारदा सदन आश्रम शाळेतील इयत्ता पहिली ते दहावी वर्गातील मुलींना ‘गुड टच बॅड टच’ विषयावर मार्गदर्शन तथा मुलींची वैद्यकीय तपासणी येथील सुप्रसिध्द डॉक्टर शिल्पा गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी वयात आलेल्या मुलींना वैयक्तिक स्वच्छता गुड टच बॅट टच व आहाराविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक ढवळे, मुचवाड, घोटमुकले तसेच श्रीमती कदम व जकाते व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी गरजू विद्यार्थिनींना औषध गोळ्या वाटप करून हा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर गाडेकर मॅडम यांचे आभार विद्यार्थिनी व मुख्याध्यापक यांच्या वतीने मानण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR