32 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रकेस कापणे, दाढी करणे महागणार

केस कापणे, दाढी करणे महागणार

मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत प्रत्येक वस्तूच्या किमतीत भलीमोठी वाढ झाली आहे. त्यातच आता येत्या नवीन वर्षात महागाईच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे. येत्या १ जानेवारीपासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार आहे. ही वाढ फक्त ग्रामीण भागात नाही तर शहरात सुद्धा करण्यात येणार आहे मात्र २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुम्ही पाहिले असेल गेल्या काही महिन्यांत नाही तर वर्षात महागाईने सर्वसामान्य नागरिकांना टेंशन दिलेले आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने त्याचा फटका इंधन दरातही झाला आहे. अशा पद्धतीने दररोज वाढत असलेल्या महागाईमुळे दरवाढ करण्याची मागणीही सलून व्यावसायिकांकडून करण्यात आली होती.

सलून असोसिएशनचे मुंबई अध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार, महागाईचा फटका प्रत्येकासह सलून व्यावसायिकांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे. त्या सर्वांचा परिणाम २० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. मात्र २० टक्के वाढही पूर्ण नसून महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या सलून व्यवसायिकांच्या दरानुसार ही वाढ करण्यात येईल.

१ जानेवारीपासून होणार दरवाढ
२० टक्के वाढ करण्यात येणार आहे परंतु सलून व्यावसायिक २० टक्के वाढ करणार नसून आपल्या ग्राहकांचा विचार करून ५ ते १० टक्के ही दरवाढ करणार आहे. मात्र आता १ जानेवारीपासून केस कापणे, दाढी करणे महाग होणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी अजून कोणत्या गोष्टी महागणार हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR