23.7 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयहल्दवानी हिंसाचारात मृतांची संख्या ६ वर

हल्दवानी हिंसाचारात मृतांची संख्या ६ वर

५ हजार जणांवर गुन्हा दाखल आतापर्यंत ४ जणांना अटक

नैनिताल : उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी १९ ओळख पटलेल्या आणि ५,००० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ४ जणांना अटक करण्यात आली आहे. यासंबधीत माहिती नैनिताल एसएसपी पीएन मीना यांनी दिली आहे.

माहितीनुसार उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील बनभुलपुरा भागात गुरुवारी हल्दवणी येथील बनभुळपुरा भागात महापालिकेने जेसीबी मशिन लावून बेकायदा मदरसा व नमाजची जागा जमीनदोस्त केली. बेकायदा मशीद व मदरशावर प्रशासनाचा बुलडोझर फिरताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त जमावाने अनेक वाहने पेटवून दिली. तसेच जेसीबीचीही तोडफोड केली. या हिंसाचारात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक पोलिस जखमी झाले आहेत. हिंसाचाराला ४८ तासांहून अधिक काळ लोटला आहे. प्रशासनाने परिसरातील इंटरनेट बंद केले आहे.

बानभूलपुरा येथेही तीन दिवस कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मात्र, नैनिताल-बरेली मोटर मार्ग कर्फ्यूपासून मुक्त ठेवण्यात आला आहे. येथे दुकाने उघडली जातील आणि वाहनांची वाहतूकही सुरू राहील. अत्यावश्यक कामांशिवाय लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे असे प्रशासनाने म्हटले आहे. तरीही बाहेर जावे लागले तर नगर दंडाधिका-यांची परवानगी घ्यावी लागेल. शहरातील सर्व आस्थापने बंद राहतील. वैद्यकीय आणि रुग्णालये सुरू राहतील. आपत्कालीन सेवा सुरू राहतील. प्रशासनाने आतापर्यंत ५ हजार हल्लेखोरांवर एफआयआर नोंदवला आहे.

१९ जणांची ओळख पटली
नैनिताल एसएसपी पीएन मीना यांच्या माहितीनुसार, या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी १९ ओळख पटलेल्या आणि ५,००० अनोळखी लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, चार जणांना अटक करण्यात आले आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या लोकांना ताब्यात घेतले जात आहे. शेकडो हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. याशिवाय वनभूलपु-यात बंदोबस्त वाढवून कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. अतिरिक्त फौजफाटाही मागवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR