32.4 C
Latur
Tuesday, February 27, 2024
Homeसोलापूरमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरि कथा यज्ञ 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हरि कथा यज्ञ 

करमाळा  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील देवीचा माळ रस्त्यावरील श्रावण नगर येथे हरी कथा कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उत्साहात सुरुवात झाली. दिव्य ज्योती जाग्रती संस्थान पाथर्डी शाखेच्या वतीने गुरुवार पासून रविवार पर्यंत होणा-या या ज्ञान यज्ञ श्रवणाचा लाभ घेण्यासाठी पहील्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, अध्यक्ष प्रा. मिलिंद फंड, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे, करमाळा विधानसभा प्रमुख राहुल कानगुडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, जयंत दळवी, शिवसेना महिला आघाडीच्या प्रियंका गायकवाड, दिव्य ज्योती जाग्रती संस्थानच्या मंजुश्री मुसळे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन दररोज कथेची सुरुवात झाली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या सहकार्यातून तसेच करमाळा नगरीतील सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दररोज या कथेची सुरुवात तालुक्यातील मान्यवर व्यक्तींच्या हातून दिपप्रज्वलन करुन होणार असून कथेची दररोजची समाप्ती ११ दांपत्यांच्या हस्ते महाआरती करून होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR