25.5 C
Latur
Friday, June 28, 2024
Homeराष्ट्रीयसहाव्यांदा एमपी झालोय, आपण मला शिकवू नका

सहाव्यांदा एमपी झालोय, आपण मला शिकवू नका

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये नवनिर्वाचित खासदारांची शपथ घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यांमुळे वाद निर्माण झाला. यानंतर लोकसभेच्या रेकॉर्डवरून संबंधित वादग्रस्त विधाने आणि घोषणा हटविण्यात आल्या. दरम्यान, बिहारमधील पूर्णिया येथून विजयी झालेले पप्पू यादव यांनीही शपथ घेतल्यानंतर, काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला असता, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि प्रोटेम स्पीकर यांनी त्यांना रोखले. यावरून यादव यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांकडे बघत निशाणा साधला.

सत्ताधारी पक्षाच्या खासदाराकडे बघत निशाणा साधताना पप्पू यादव म्हणाले, मी ६ व्यांदा खासदार झालो आहे. आपण मला शिकवणार?’ शपथ घेण्यासाठी पोहोचलेल्या पप्पू यादव यांच्या गळात #फील्लीी३ असे लिहिलेली एक चिठ्ठी दिसून आली. त्यांनी आपल्या शपथेची सुरवात, ‘प्रणाम पूर्णिया, प्रणाम बिहार, सलाम बिहार, जोहार बिहार’ ने केली

भोजपुरी भाषेतून शपथ, नंतर घोषणाबाजी
पप्पू यादव यांनी भोजपुरी भाषेतून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर धन्यवाद म्हणताना त्यांनी, नीट परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी केली. याच बरोबर त्यांनी बिहारला विशेष दर्जा देण्याचीही मागणी केली. तसेच त्यांनी सीमांचल ंिझदाबाद, मानवतावाद ंिझदाबाद अशा घोषणा दिल्या. यावर प्रोटेम स्पीकर आणि संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना घोषणाबाजी थांबवण्यास सांगितले.

‘आपण कृपेने जिंकले असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे’ –
यावर पप्पू यादव म्हणाले, मी ६ वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे. आपण मला शिकवाल? तसेच, पप्पू यादव सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडे इशारा करत म्हणाले, ‘आपण कृपेने ंिजकला असाल, मी अपक्ष विजयी झालो आहे.’ मी चौथ्यांदा अपक्ष निवडणूक ंिजकून आलो आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR