परंडा : आरोपी बालाजी माधवराज पारसे (रा. बोन्ती, ता. औराद) यांनी १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता कांदलगाव येथील कांदलगाव शिवार शेत गट नं. ११० मधील पालावर (ता. परंडा, जि. धाराशिव) मधुकर सुखदेव चौबे यांच्या शिवारामधील विहिरीत मीनाबाई बालाजी पारसे (रा. बोंती, ता. औराद, जि. बिदर) यांना आरोपीने दारू पिऊन लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलून दिले. या घटनेत विवाहितेचा मृत्यू झाला.
मृत महिलेच्या बहिणीने आरोपीविरोधात पोलिसांत तक्रार दिली असून आरोपी बालाजी माधवराव पारसे याच्यावर गुन्हा दाखल करत पोलिस पुढील तपास करीत आहेत.