24 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरसुर्यवंशी, टेकाळेंच्या जामीन अर्जावर १७ ऑगस्टला सुनावणी

सुर्यवंशी, टेकाळेंच्या जामीन अर्जावर १७ ऑगस्टला सुनावणी

अरविंदच्या नातलगांच्या मागण्यांची पोलिस यंत्रणा देईना दाद

लातूर : प्रतिनिधी
माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर हे अध्यक्ष असलेल्या जयक्रांती शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा(जेएसपीएम) संचलित येथील जुन्या एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपेचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात न्यायालयीन कोठडीतील आरोपी विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यांनी जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी पोलिसांनी यासंदर्भात आपले म्हणणे सादर केले नसल्याने आता यावर दि. १७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.

अरविंदच्या मृत्यू प्रकरणी दोषींवर शवविच्छेदन अहवालानूसार कारवाई करावी या अरविंदचे नातलग व समाजबांधवाच्या मागणीची कसलीच दाद ना फिर्याद पोलिस प्रशासनाकडून घेतली जात नसल्याचे अरविंदच्या नातलगांचे म्हणणे आहे. स्वामी विवेकानंद राजमाता जिजाऊ वसतिगृहात अरविंद खोपे या अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दि. २९ जुलैच्या रात्री घडली होती. या प्रकरणी आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या वस्तीगृह व्यवसथापक विठ्ठल सुर्यवंशी व विनायक टेकाळे यांनी जिल्हासत्र न्यायालयाकडे जामीन मिळावा यासाठी अर्ज केला आहे.

जिल्हासत्र न्यायालयाने या अर्जावर पोलिसांना आपले म्हणने सादर करण्याचे आदेश देत दि. १२ ऑगस्ट रोजी सुनावणी ठेवली होती. परंतु पोलीसांनी सोमवारी आपले म्हणने न्यायालयात सादर केलेले नाही. त्यामुळे आता दि. १७ ऑगस्ट रोजी आरोपींच्या जामीन मागणीच्या अर्जावर सुणावणी होणार आहे.

तर दुसरीकडे मयत अरविंदचे नातलग व समाजबांधवाकडून विविध अंदोलनाद्वारे व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांना प्रत्यक्ष भेटून अरविंदच्या मृत्खूप्रकरणी शवविच्छेदन अहवालानूसार योग्य तपास होत नाही. या प्रकरणाची सीआयडी, सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याकडून प्रशासनाचे उंबरवठे झिजवले जात आहेत. परंतु, त्यांच्या मागण्यांची पोलीस प्रशासनाकडून तर कसलीच दाद ना फिर्याद घेतली जात असल्याने न्याया मागावा तरी कोणाकडे, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR