मुंबई : पुढील ३ दिवसांत कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे तर मुंबई, ठाणेसह कोकणात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
दि. ३० मे रोजी मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील, असा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये दमट हवामान असेल.