26.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा

राज्यात शनिवारपासून जोरदार पावसाचा इशारा

पुणे : प्रतिनिधी
मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. बुधवारी (५ जून) मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात मोसमी पाऊस गोव्यातच अडखळला आहे. आज गुरुवारी (६ जून) तळकोकणात मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून (८ जून) पुढील तीन दिवस राज्याच्या बहुतेक भागात जोरदार पूर्वमोसमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पाऊस मंगळवारी (४ जून) गोव्यात दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान आहे. त्यामुळे बुधवारी (५ मे) तळकोकणात पाऊस दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात पाऊस गोव्यातच अडखळला आहे. सिंधुदुर्गमध्ये बुधवारी ढगाळ वातावरण तयार झाले होते. तापमानात घटही झाली आहे. सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. पण, तो पूर्वमोसमी होता. गुरुवारी (६ जून) मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईसह किनारपट्टी, घाट परिसरात पाऊस
हवामान विभागाने शनिवारी (८ जून) आणि रविवारी (९ जून) रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या अन्य भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी रविवारपासून पुढील दोन दिवस मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह पश्चिम घाटात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भासह राज्याच्या बहुतेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR