25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeराष्ट्रीयहिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे अनेक वाहने ढिगा-याखाली गाडली

हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे अनेक वाहने ढिगा-याखाली गाडली

शिमला : गुरुवारी रात्री आणि आज सकाळी देशाच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे डोंगरात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्याच्या आसपास अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. या भूस्खलनाच्या ढिगा-याखाली अनेक वाहने गाडली आहेत. त्यामुळे अराजकता निर्माण झाली. पावसात ही वाहने डोंगरातून जात असताना अचानक डोंगरावरून मोठमोठे दगड घसरून रस्त्यावरून जाणा-या वाहनांवर पडले. यात ३ ते ४ वाहने अडकली आहेत. मात्र, या वाहनातील लोकांना मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळी आरडाओरडा केल्यानंतर तेथून जाणा-या वाहनचालकांनी लोकांचे प्राण वाचवले. तसेच या घटनेची माहिती पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला दिल्यानंतर बचाव मोहीम हाती घेण्यात आली. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे डोंगरावर जाणा-या पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हिमाचलमधील उंचावर असलेल्या जिल्ह्यांतील रस्ते आणखी प्रभावित झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि खराब हवामानाबाबत स्थानिक प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. तसेच हिमाचलमधील अनेक जिल्ह्यांमध्ये आणखी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

दिल्लीतील रस्ते पाण्याखाली
दरम्यान, केवळ पर्वतच नव्हे तर उत्तर भारतातील मैदानी भागातही पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर पाणी साचले असून, वाहने बुडाली आहेत. यासारख्या घटना समोर आल्या आहेत. यासोबतच राजधानी दिल्लीतील अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यामुळे निम्म्याहून अधिक ट्रक आणि कार पाण्याखाली गेल्या आहेत. नोएडा सेक्टर १८ जवळ रस्त्यालगतच्या फुटपाथची रेलिंग तुटून पडली आहे, तर इंदिरा गांधी विमानतळावरील टर्मिनल-१ चा छत कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एक जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR